29 May 2020 Motor guru daily report & Automobile Engineering CRDI System
नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर भोसले मोटर गुरू या माझा ब्लॉग वर आपले स्वागत करतो. करोना चा प्रसार वाढतो आहे ,सर्वांनी स्वतः घरात राहून जीव वाचवला पाहिजे. मध्यम वर्गीयांना लोकडाउन मुळे घर कसे चालवावे याचा प्रश्न पडला आहे कारण गरिबांना सरकार मदत करते श्रीमंतांना त्यांचा वेळ छंद जोपासण्याचा जात आहे पण मध्यम वर्गीयांना बिल , लोणचे हप्ते यांचा प्रश्न सतावत आहे घरात खायला ही काही नाही. एक देश एक रेशनकार्ड हा सरकारचा उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी तो कितपत यशस्वी होईल यात शंकाच वाटते. सोलापूर माझी सिटी कॉरोनाचा विळख्यात पुरती अडकली आहे.मृतांचा आकडा वाढतंच आहे. लोकडाऊन 5.0 कसा असावा ???? कंमेंट करून सांगा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सीआरडीआय (कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन) सीआरडीआय म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन म्हणजेच डिझेल इंजिनच्या सिलिंडर्समध्ये इंधनचे थेट इंजेक्शन सिंगल, कॉमन लाइनद्वारे दिले जाते, ज्याला सामान्य रेल म्हणतात जे सर्व इंधन इंजेक्टर्सला जोडलेले असते. सामान्य डिझेल थेट इंधन-इंजेक्शन सिस्टमला प्रत्येक इंजेक्शन सायकलसाठी नव्याने दबाव वाढवावा लागतो, परंतु नवीन ...